Mitchell Santner | चेन्नईविरुद्ध कॅच घेताना खांद्याला गंभीर दुखापत, मुंबईचा स्टार खेळाडू दोन महिने मैदानापासून राहणार लांब

खांद्याच्या दुखापतीमुळे मिचेल सँटनर क्रिकेटपासून दोन महिने दूर; चेन्नईविरुद्ध कॅच घेताना झालेली दुखापत <br/>

Mitchell Santner | चेन्नईविरुद्ध कॅच घेताना खांद्याला गंभीर दुखापत, मुंबईचा स्टार खेळाडू दोन महिने मैदानापासून राहणार लांब

न्यूझीलंडचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू आयपीएल 2026 च्या संपूर्ण हंगामाला मुकणार आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे त्याला जवळपास दोन महिन्यासाठी क्रिकेट खेळता येणार नाहीये. चेन्नई विरुद्धच्या सामन्यात कार्तिक शर्माचा झेल घेताना त्याला दुखापत झाली. मिचेल सँटनरच्या जागी मुंबईने उर्वरित सामन्यांसाठी केशव महाराज याला संघात समाविष्ट केले आहे.

हेही वाचा – PL 2026: विराट कोहलीवर बंदीची टांगती तलवार? पंचांशी घातलेला 'तो' वाद पडणार महागात 

मिचेल सँटनर याच्या जाण्याने मुंबईचा फायदादेखील आहे आणि नुकसानदेखील असं म्हणता येईल. मुंबईची फिरकी गोलंदाजी कमकुवत झाली आहे. मिचेल सँटनर  आणि अल्लाह गजनफर यांना सोडून मुंबईकडे चांगले फिरकी गोलंदाज नाहीत. मुंबईने केशव महाराज याला संघात समाविष्ट केले, मात्र केशव महाराजपेक्षा मिचेल सँटनर किंचित प्रमाणात म्हटलं तर चांगला गोलंदाज आहे. केशव महाराज कसोटीचा चांगला गोलंदाज आहे, जिथे सँटनर थोडा मागे पडतो. मिचेल सँटनर केशव महाराजपेक्षा चांगला फलंदाजदेखील आहे. त्याच्या जाण्याने मुंबईला फटका बसला, पण मुंबईला आता शेरफन रदरफोर्ड आणि विल जॅक्स या दोघांना संघात समाविष्ट करण्याची संधी मिळेल.  सँटनर न्यूझीलंडचा कर्णधारदेखील आहे. त्यामुळे त्याच्या कर्णधारपदाचा अनुभव मुंबईला फाफायदेशीर ठरतो.

हेही वाचा – Lowest Score In History Of IPL : सर्वात अनुभवी खेळाडूंचा संघ, पण Lowest Score चा रेकॉर्ड मोडण्यात अग्रेसर; IPL च्या इतिहासातील या संघांचा लाजिरवाणा पराभव, वाचा यादी 

मुंबईने मिचेल सँटनर याला 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये 2 कोटी या किमतीत संघात समाविष्ट केलं होतं. 2025 मध्ये त्याने मुंबईसाठी 13 सामन्यांत 10 विकेट्स घेतल्या होत्या. 2026 च्या हंगामात सँटनरने 5 विकेट्स घेतल्या आणि 136 च्या स्ट्राईक रेटने 26 धावा केल्या होत्या. आयपीएलच नाही तर तो आयर्लंडविरुद्धच्या एका कसोटी सामन्याला मुकणार आहे. मिचेल सँटनर हा आता जुलैमध्ये क्रिकेटच्या मैदानात परतणार आहे.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number